मुंबई : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने काल(१७ सप्टें.) औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित होते. दरम्यान औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनवेळी ठाकरे यांनी केलेल्या ‘आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’, या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते शुक्रवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात अनेकांना संभ्रमात टाकणारी ठरली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिशेने पाहत, मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, असे म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात कालपासून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आता या मुद्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना सल्ला देताना त्यांनी महायुतीत यावे, आणि फडणवीसांचे गीत गावे. फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे, आणि उद्धवजींना घेऊन यावे, अशी कविता केली. गो कोरोनासारखी माझी हाक ‘कम उद्धवजी’ अशी असेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांना सल्ला देताना उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घ्यावे, 2.5 वर्षे त्यांना द्यावे, अडीच वर्षे आपण घ्यावे, असा सल्ला दिला.
दरम्यान, आपल्याला आरपीआय स्वत:च्या हिंमतीवर आमदार, खासदार निवडून येतील असा उभारता आला नाही. यामुळे अनेकांना न्याय देता आला नाही, असे सांगत कार्यकर्त्यांची माफी देखील मागितली आहे. ज्या समाजासाठी मी लढलो, त्याच आपल्या लोकांनी माझ्यावर ठिकठिकाणी हल्ले केले. याचे मला आयुष्यभर वाईट वाटत राहील असे आठवलेंनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात; प्रशासनाकडून नियमावली जारी
- ‘भाजपात एकमेव मोदींचा चेहरा, बाकी सारे नाचरे मुखवटे’ शिवसेनेची टीका
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली


