🕒 1 min read
उत्तराखंड : कोरोना संक्रमणामुळे चार धामच्या यात्रेवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यावर्षी उत्तराखंड हायकोर्टाने चार धाम यात्रेवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे दर्शनासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. उत्तराखंडमधील चार धाम यात्रेवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. गुरुवारी, उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने यात्रा बंदीचा २८ जूनचा निर्णय रद्द केला आहे. यामध्ये कोरोना संबंधी नियमांचे पालन करत न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
Char Dham Yatra | Uttarakhand govt issued the SOP on Friday. Registration & e-pass will be mandatory for 'darshan' in the four dhams. Along with this, it's necessary for devotees to have either both the doses of #COVID19 vaccine or negative COVID report not older than 72 hours.
— ANI (@ANI) September 18, 2021
चारधाम यात्रेसाठी सर्वसमावेशक कार्य पद्धती जारी करण्यात आली आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम येथे दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना नोंदणी केल्यानंतर ई-पास जारी केले जातील. तसेच बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांनाही स्मार्ट सिटी पोर्टलवर अनिवार्य नोंदणी करावी लागेल. तसेच देखील भाविकांच्या संख्येवर देखील बंदी घालण्यात आली आहे. केदारनाथ धाममध्ये दररोज ८००, बद्रीनाथ धाममध्ये १२००, गंगोत्रीत ६००, तर यमुनोत्रीत ४०० भाविकांना प्रवेश दिला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. मंदिरांभोवती असलेल्या कुंडांमध्ये स्नान करण्याची यात्रेकरूंना परवानगी दिली जाणार नाही असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती सोडून सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना त्यांचे फोन बंद ठेवण्याचे निर्देश देहराडून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नियमांचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल असेही आदेश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
- ‘मुंबई इंडियन्स नाही तर ‘या’ संघाकडे आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकण्याची मोठी संधी’
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
