🕒 1 min read
मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या निवडणुकीसाठी लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्या शासकीय कर्मचारी असल्याने महानगर पाकिकेने त्यांचा राजीनामा अर्ज फेटाळून लावला. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे गट न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. याबाबत आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
याबाबत बोलताना आठवले म्हणाले कि, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप, शिंदे गटाचा उमेदवार आहे. या भाजपच्या उमेदवाराला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे. उद्धव ठाकरे यांची मशाली पेटवलेली दाखविण्यात आली आहे. पण, या निवडणुकीमध्ये ही मशाल विझविण्याचं काम करणार आहोत. भाजपचं कमळं फुलंवायचं आहे. रिपब्लिकन पक्ष भाजपच्या पाठीशी उभा राहणार आहे.
ऋतुजा लटके यांना ठाकरेंनी उमेदवारी देऊ केली आहे. पण, ऋतुजा यांनी राजीनामा दिला. तो मनपा प्रशासनानं स्वीकारलेला नाही. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, राजीनामा नियमानुसार आधी द्यावा लागतो. याच्याशी सरकारचा काही संबंध नाही. हा प्रश्न अधिकारी स्तरावरचा आहे. यात सरकारचा दबाव आणण्याचा प्रश्न काही येत नाही, असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने फेटाळला –
काही वेळापुर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या ऋतुजा लटके शिवसेनेतील नेत्यांसोबत महापालिकेमध्ये गेल्या होत्या. यावेळी आजच आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती लटकेंनी केली होती. मात्र, महापालिकेने ही विनंती फेटाळत राजीनामा देखील फेटाळला आहे. अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत आहेत. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु होती. अशातच राजीनामा फेटाळल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट न्यायालयात धाव घेऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या :
- Samana । मोदी जगाचे नेते! देशातील प्रश्न नेहरूंचे!; शिवसेनेचा सामानातून नरेंद्र मोदींना सवाल
- MNS | ऋतुजा लटके यांच्या विरोधात ‘या’ नेत्याने रचला डाव ; मनसे नेत्याचा गंभीर आरोप
- Gulabrao Patil | संजय राऊतांनी आईला पत्र लिहिताच गुलाबराव पाटलांची देवाला प्रार्थना, म्हणाले…
- Andheri By-Elections । निकाल ऋतुजा लटकेंच्या विरोधात गेल्यास पर्यायी उमेदवार कोण?ठाकरे गटाचा प्लॅन B तयार
- Andheri By Election | ठाकरे गटाचा प्लॅन बी! लटकें ऐवजी ‘या’ नेत्याला मिळेल उमेदवारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

