मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ज्येष्ठ सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण करू देणार नाही, अशी धमकी दिली आहे. त्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करील, तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या सिने कलाकारांचे संरक्षण करील; त्यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल असा, ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला होता.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लवकरच बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात गुंडाराज नाही. त्यामुळे तुम्ही असे विधान करु शकत नाही. जर तुम्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाचे शुटींग बंद करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रामध्ये शूटिंग करू देणार नाही, अशी धमकी दिली होती. नाना पटोले यांच्या या भूमिकेला रामदास आठवलेंनी विरोध दर्शवला आहे. जर तुम्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाचे शूटींग बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तर रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येतील, असे आठवलेंनी सांगितले.
सेलिब्रिटी सिने अभिनेते हे पेट्रोल दरवाढी वरून केंद्र सरकार वर टीका करीत नाहीत, असा आरोप करून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नसल्याची धमकी दिली होती. अशी धमकी देणे चुकीची आहे.
‘नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे.’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी यापूर्वी व्यक्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा
- मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्र प्रवर्गाद्वारे आरक्षण द्या – रिपाइं
- मोदीसाहेब ‘मन की बात’ मध्ये गोड- गोड बोलतात पण काम काहीच करत नाहीत
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- …अन्यथा वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल; वारकरी-सरकारमध्ये संघर्षाची चिन्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

