पालघर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. अद्यापही सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. तर, मराठा समाजाने आंदोलने व अनेक ठिकाणी निदर्शने सुरु ठेवले आहेत. तर, काही मराठा नेत्यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. यानंतर, ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला असून रिपाइं ने देखील मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
मराठा समाजाला एस सी एस टी ओबीसींच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. सवर्ण समाजातील गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला आहे. त्यात आता जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
ते पालघर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आदिवासी भागाची पाहणी करून सोयीसुविधांचा आढावा देखील घेतला. पुढे ते म्हणाले, ‘ आगामी जनगणना ही जाती आधारित करावी. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल.’
‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
‘पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगा चे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकार मे अद्याप वेतन दिलेले नाही ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही…उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे,’ अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राने पवारांना रिटायर्डच केले पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ?’
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है – जितेंद्र आव्हाड
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- ‘अहो ! आधी तुमची मानसिकता बदला, मग दुसऱ्यांना सल्ला द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
