अंबरनाथ : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अंबरनाथ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यातून बोलताना मोदींवर सडकून टीका केली आहे. खरतर लोकसभेमध्ये विरोधी पक्षाच्या एक परखड वक्त्या म्हणून त्यांची ओळख आहे.
‘मन की बात’ मधून एक फोन करा असं मोदी सांगतात परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदीसाहेब ‘मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात परंतु माझ्या आंदोलन करणार्या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळाव्यात केला.
पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात गेमचेंज झाला. यावेळी महाराष्ट्रातील जनता साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली त्या जनतेचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विशेष आभार यावेळी मानले शिवाय साताऱ्याच्या पावसातील सभेने महाराष्ट्राचे चित्र बदलले याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली.
पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिला त्याचा मानसन्मान नक्कीच केला जाईल. राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन जो एकटा लढत होता त्याचाही मानसन्मान १०० टक्के करणार असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- पुन्हा लॉकडाऊन? कोरोना फैलावत असल्याने उद्योग क्षेत्र चिंतातूर
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है – जितेंद्र आव्हाड
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

