पालघर : ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही…उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे,’ असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. ते पालघर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आदिवासी भागाची पाहणी करून सोयीसुविधांचा आढावा देखील घेतला.
‘पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगा चे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकार मे अद्याप वेतन दिलेले नाही ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही…उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे,’ अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
यासोबतच, पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असे आश्वासन रामदास आठवले म्हणाले. येत्या दि. 25 फेब्रुवारीला संपूर्ण देशात गरीब भूमिहीनांसाठी 5 एकर जमीन देण्यात यावी या मागणीसाठी रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है – जितेंद्र आव्हाड
- दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

