Share

पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : महाराष्ट्राला पुरोगामी दूरदृष्टी असलेल्या विचारवंतांचा आणि नेत्यांचा फार मोठा वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यापूर्व काळ असो वा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, महाराष्ट्रात समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा तसेच महिला सबलीकरण यासाठी अनेक चळवळी राबवल्या गेल्या. मात्र, पुरोगामित्वाचा साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे.

जातपंचायतींमुळे अनेक नागरिकांना आज देखील अन्याय व क्रूर पद्धतींना सामोरे जावे लागत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. महिलांवर त्यांच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागते. याबाबत अनेक प्रकार तुम्ही वाचले असतील वा कानावर पडले असतील. जात पंचायतीच्या अघोरी आणि अन्यायी न्यायनिवाड्याच्या विरोधात अनेक चळवळी झाल्यानंतर कायद्यांनी देखील गंभीर गुन्ह्याची तरतूद केली. मात्र, अजूनही असे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जायपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. यासाठी दगडांची चूल मांडली गेली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं.

हात भाजला तर महिला चारित्र्यहीनआणि भाजला नाही तर चारित्र्य संपन्न असा चुकीचा समज या जातपंचायतींद्वारे लोकांमध्ये निर्माण केला गेला आहे. अखेर या हतबल महिलेला उकळत्या तेलात नाईलाजाने हात घालावा लागला. आणि तेल अत्यंत गरम असल्याने स्वाभाविकपणे महिलेचा हात भाजला व उपस्थितांसह पतीने देखील तिला चारित्र्यहीन ठरवले. संतापजनक म्हणजे व्हायरल झालेला व्हिडीओ हा संबंधित महिलेच्या पतीनेच काढला आहे.

या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. यानंतर, समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींना शिक्षा करण्याची मागणी होत आहे. सदर व्हिडीओ हा नाशिक मधील असल्याचं समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!