Share

ओबीसी आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीला न बोलावल्याने रामदास आठवले नाराज

Published On: 

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहावर शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुभाष देसाई, विजय वडेट्टीवार आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र, रिपब्लिकन पक्षाला निमंत्रित करण्यात आले नाही. याबद्दल रिपब्लिकन पक्ष तीव्र नाराजी व्यक्त करत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले शनिवारी सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी व आपत्तीग्रस्तांना मदत वाटपासाठी साताऱ्यात आले होते. यापूर्वी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहेत. त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी आपली भूमिका असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

दरम्यान, नारायण राणे यांच्यामुळे सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. मात्र, अशा स्थितीतही आठवले यांनी भाजप-सेना युतीबाबत भविष्यवाणी केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली असेल. यामध्ये पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहावा, उपमुख्यमंत्रीपद भाजपला द्यावे या पद्धतीची चर्चाही झाली असेल,’ असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!