टीम महाराष्ट्र देशा : महाजानादेश यात्रेतील अहमदनगर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना जेवढे जास्त मते मिळतील तेवढे मोठे मंत्रीपद देऊ, असंही म्हटलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी राम शिंदे निवडूनच येणार नाही, तर त्यांना मंत्री कसं करणार ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. ते जामखेड येथे बोलत होते.
शिवस्वराज्य यात्रेतील सभेत बोलताना पाटील यांनी ‘एकीकडे माझ्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतो आहे, पूर आला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना यांच काहीही देणंघेणं नाही. ते केवळ यात्रा काढत आहेत. विरोधकांना ईडीची भीती दाखवत आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
दरम्यान याच सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यात राष्ट्रवादीचा झंझावात असा येणार आहे की, कमळाची पाकळीही शिल्लक राहणार नाही असं विधान कोल्हे यांनी केले आहे. तसेच उमदं नेतृत्व जामखेडमध्ये उदयाला येत आहे. एक महत्वाचं इथे घडलं आहे. ते म्हणजे दोघेजण आमनेसामने येण्याची पहिली वेळ, या जामखेडच्या यात्रेच्या माध्यमातून घडली आहे असेही अमोल कोल्हे म्हणाले.
शिवस्वराज्य यात्रेतील जामखेड येथील सभेत तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे, युवानेते रोहित पवार, मेहबूब शेख, रुपाली चाकणक, यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.
- धनंजय मुंडेंसारख्या वाघाला निवडणूक आणण्याची संधी सोडू नका – अमोल कोल्हे
- भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या…
- ईव्हीएम तुम्हांला हरवत नसून जनताचं हरवत आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- चित्रा वाघ यांची आम्हीच हकालपट्टी करणार होतो, राष्ट्रवादीचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

