टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजप प्रवेशाची तयारी केली आहे.
चित्रा वाघ यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा फोजिया खान यांनी टीका केली आहे. त्यांनी ‘चित्रा वाघ यांची आम्हीच हकालपट्टी करणार होतो, वाघ यांच्याबद्दल वर्षभरापासून तक्रारी होत्या, त्यांनी पक्षात राहूनही पक्षाचे नुकसानच केले अशा शब्दात वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीतून नेत्यांची गळती सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असणारे अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी आज भाजपमध्ये जाण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

