Share

ईव्हीएम तुम्हांला हरवत नसून जनताचं हरवत आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:- भाजपची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत. परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते करतात. परंतु ईव्हीएम त्यांना हरवत नसून जनता त्यांना हरवत आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. महाजनादेश यात्रा अहमदनगर येथील पाथर्डी येथे आली असता ते बोलत होते.

पुढे  बोलताना फडणवीस म्हणाले, पुढची २५ वर्षे भाजप सरकार सत्तेतून हटणार नाही, कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. भाजपने काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी भाजपने महाजानदेश यात्रा काढलेली आहे. तसेच ते या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही काँग्रेसच्या यात्रेकडे मात्र जनतेने पाठ फिरवली आहे,असा दावाही यावेळी त्यांनी केला.

दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूका जवळआल्यामुळे राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिव स्वराज्य यात्रेचे तर कॉंग्रेस कडून महापर्दाफाश सभेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. यामुळेच फडणवीस यांनी विरोधकांना टोला लावला आहे. तर विरोधकांनी या यात्रेमधून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!