Share

रक्षाबंधनाची भेट! एसटी महामंडळाच्या तिजोरीत ५० लाखांचे उत्पन्न

Published On: 

औरंगाबाद : नुकताच साजरा करण्यात आलेल्या रक्षाबंधन सणामुळे एसटीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते मात्र आता हळूहळू प्रवासी संख्या वाढत असल्याने एसटीचे झालेले नुकसान भरून निघत आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे चार दिवसाच्या कालावधीत एसटीमहामंडळाने आपल्या तिजोरीत सरासरी ५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दिड वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली होती. एसटी बंदमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. दरम्यान राज्य सरकारने अनलॉक करण्याची घोषणा केल्यानंतर एसटी महामंडळाने काही मार्गावर आपली बससेवा सुरू केली. सुरू केलेल्या बससेवेला मध्यंतरीच्या काळात म्हणावा, तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र नुकत्याच झालेल्या रक्षा बंधनासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन प्रत्येक आगाराच्या प्रमुखांना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या सूचनाचे सर्व आगार प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत विविध मार्गावर जादा बसेस सोडल्या होत्या. या सर्व जादा बसेस २१ ते २४ ऑगस्टपर्यंत अशा चार दिवस विविध मार्गावर धावल्या. औरंगाबाद विभागातील जवळपास ४१५ एसटी बसेस या विविध मार्गावर प्रवाशांना घेऊन धावल्या. त्यांनी एक लाख ५५ हजार किलोमीटर अंतर कापून एसटीच्या तिजोरीत सरासरी ५० लाखाचे उत्पन्न पाडून दिले. योग्य वेळी योग्य नियोजन केल्यामुळे एसटीला याचा फायदा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!