मुंबई : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सर्वांचा चर्चेचा विषय बनणारी, दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत आहे. राखी सावंतचा सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसं, तर राखीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतू आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ खूपच वेगळा असल्याचं समजतं आहे. या व्हिडीओमध्ये राखी बीएमडब्लू गाडी घेत असल्याचं दिसतं आहे.
काही दिवसांपूर्वी हिच राखी एका कारच्या शोरूममध्ये दिसली होती. त्यावेळी तिला तू गाडी घेतीयेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने चेहरा पाडत ‘माझ्याकडे 50-60 लाख रूपये नाहीत, मी काय गाडी घेणार,’ असं उत्तर तिने दिलं होतं.
परंतू आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्काच बसला आहे. मात्र व्हिडीओमध्ये दिसत असलेली बीएमडब्लू गाडी राखीने स्वत:च्या पैशाने घेतली नसून, तिला ती गिफ्ट देण्यात आली असल्याचं समजतं आहे.
तसेच, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ राखी सावंतने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. तिने नुसता व्हिडीओ शेअर केला नसून, राखीने व्हिडीओसोबत ‘माझी नविन कार’ असं कॅप्शनही दिलं आहे. त्याचबरोबर ही कार तिला ज्यांनी गिफ्ट केली आहे, त्या लोकांची नावे देखील तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिली आहेत. शेली लाथर आणि आदिल खान दुरानी या दोघांना राखी सावंतने पोस्ट करत धन्यवाद म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या –


