Share

IPL 2022 : दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला बसला धक्का; पुढच्या दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होणार ‘हा’ खेळाडू?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मधील दुसऱ्या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. हैदराबादचा स्टार गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर किमान दोन सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. गुजरात टायटन्सविरुद्ध हैदराबादने स्पर्धेच्या या मोसमातील दुसरा विजय नोंदवला. गुजरातविरुद्ध अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने अत्यंत तगडी गोलंदाजी करताना ३ षटकांत केवळ १४ धावा दिल्या. त्याला यश मिळाले नसले तरी बाकीच्या गोलंदाजांच्या तुलनेत त्याची गोलंदाजी सर्वात किफायतशीर होती.

सुंदरच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे हैदराबादकडून पुढील किमान दोन सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. हैदराबादसाठी लेग-स्पिनर श्रेयस गोपाल आणि डावखुरा फिरकी अष्टपैलू जे सुचित हे दोन संभाव्य पर्याय आहेत, जे प्लेइंग इलेव्हनमध्ये सुंदरची जागा घेऊ शकतात.

हैदराबादच्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीत सुंदर चेंडू घेऊन चालला नाही. त्याने ३ षटकात ४७ धावा दिल्या आणि त्याला एकही यश मिळाले नाही. या सामन्यात त्याने १४ चेंडूत ४० धावा केल्या. यानंतर त्याने पुनरागमन केले आणि पुढील ३ सामन्यात ४ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!