मुंबई : सध्या आयएएस अधिकारी टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या विवाह बंधनाची चर्चा सगळीकडे होत असताना, आता मध्यप्रदेशमधील आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांच्या विवाह बंधनाची जोरदार चर्चा होत आहे. शैलबाला या पत्रकार डॉ. राकेश पाठक यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. याची माहिती स्वतः राकेश यांनी दिली आहे. राकेश आणि शैलबाला हे दोघे मागील दोन वर्षांपासून चांगले मित्र आहेत.
“मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र चांगला वेळ घालवला आहे. आम्हाला लक्षात आले की आम्ही चांगले मित्र आहोत. आणि सोबतच आम्हा दोघांना जीवनसाथी व्हायला ही काही हरकत नाही. त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे राकेश पाठक म्हणाले.
शैलबाला मार्टीन या २००९ बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. राकेश पाठक यांचा हा दुसरा विवाह आहे. त्यांना दोन मुलीही ही आहेत. दोघांच्याही घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न होत आहे. स्वतः राकेश पाठक यांनी ही माहित सोशल मीडियातून दिली. दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या :


