अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात नागवडे घराण्याचे मोठे वजन आहे. आजपर्यंत नेहमीच सोयीनुसार पक्ष आणि नेते बदलणारे नागवडे कुटुंबीय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक मानले जातात. नागवडे घराण्याचा तालुक्यामध्ये कोणताही कार्यक्रम असला की हर्षवर्धन पाटील प्रमुख पाहुणे असत.
मात्र, शनिवारी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी राजेंद्र नागवडे यांनी भाजप नेत्यांना टाळत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कार्यक्रम उरकला. त्यामुळे नागवडे कुटुंब हे नेमके भाजपचे आहे की कॉंग्रेसचे हेच तालुक्यातील जनतेला सद्यस्थीतीत समजत नसल्याचे चित्र आहे.
श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे मागील विधानसभेला भाजपमध्ये आले. त्यांनी आ.बबनराव पाचपुते यांचे मनापासून विधानसभेला काम केले. परंतु काल स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम आणि कोविड सेंटर उद्घाटन समारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. मात्र या कार्यक्रम पत्रिकेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व खासदार सुजय विखे यांचे नाव देखील नव्हते. त्यामुळे नागवडे नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच सद्यस्थितीत समजत नाही.
दरम्यान मागील विधानसभेला भाजप सोबत असलेले नागवडे कुटुंबीय आगामी काळात भाजपला धक्का देत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- ‘मी असं काहीही बोललेलो नाही’, अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण !
- छोट्याशा जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या पत्त्यावर जाणार तब्बल एक लाख पत्रं
- खबरदार! लोकलने प्रवास कराल तर कायदेशीर कारवाई; मनसे नेते संदीप देशपांडेंना नोटीस
- ‘शिवसेनेच्या कंगना विरोधातील आंदोलनाला परवानगी, मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का?’
- महाराष्ट्रातील ‘या’ संपूर्ण जिल्ह्यात होणार मास्कची सक्ती, पालकमंत्र्यांनी दिले आदेश


