कोल्हापूर: पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने महावितरण तसेच सरकारला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्येचा व्हिडिओ देखील बनवला होता. यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक झाले असल्याचे दिसत आहे. रविकांत तुपकर यांनी देखील या घटनेवरून आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती.
याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राजू शेट्टी म्हणाले, पंढरपूर तालुक्यात एका युवा शेतकऱ्याने वीज बिल भरता येत नाही म्हणून आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी संयमाने राहावे. सरकारला सळो की पळो करून सोडू. तसेच आंदोलन आणखी तीव्र करण्याचा देखील इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
सलमान खानसोबत चक्क लग्नाचे फोटो ? ‘सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा’
-
“मोदींच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोच्या…”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य
-
राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताय; संजय राऊतांचा प्रहार
-
इंग्लिश कर्णधाराकडून क्रिकेटच्या जादुगारला श्रद्धांजली, भावनिक होत म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
