Share

‘स्वाभिमानी’मध्ये सर्व आलबेल, शेट्टींच्या विधानपरिषद उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Published On: 

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी ऑफर करण्यात आली आहे. संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शेट्टी यांनी राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारली. मात्र, स्वाभिमानीतील काही प्रमुख नेत्यांनी याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शेट्टी यांनी उद्विग्न होत आमदारकीची ब्याद नको म्हणत समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान आता पुन्हा एकदा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संघटनेत सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवल जात आहे.

शुक्रवारी संघटनेतील प्रमुख पदाधिकारी नेत्यांची बैठक पार पडली यावेळी, स्वतः माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या विधान परिषद उमेदवारीने नाराज असलेले जालिंदर पाटील, सावकर मादनाईक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कळत न कळत आमच्यामध्ये जे गैरसमज निर्माण झाले ते सर्व संपले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ होती व नेहमीच एकसंघ राहिल. आम्ही सर्वजण शेतकरी हिताशी बांधील आहोत. आमच्यामध्ये आता कसेलेही मतभेद उरले नाहीत. सर्वजण एकदिलाने ,एकजुटीने व एकमताने चळवळीचे काम करू, अशी भावना बैठकीनंतर व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नेत्यांची नाराजी दूर झाली राजू शेट्टी यांच्या आमदारकीचे घोडे गंगेत न्हाहले असून असून ते राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार होणार का हे निश्चित झाल आहे.

संघटनेतील नाराजीनाट्यावर राजू शेट्टी यांची उद्विग्न फेसबुक पोस्ट

राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्विकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले.

जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. १२ जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक,पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्विकारण्याचे ठरले. माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपुर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्या नावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन मी १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांना पक्षाचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला.

आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच…

शेतक-यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही. स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणिही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये.
– राजू शेट्टी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!