🕒 1 min read
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्रविण दरेकर यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचेही आशिष शेलार म्हणाले आहेत.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असतांना आशिष शेलार म्हणाले की,‘केंद्रीय यंत्रणा भ्रष्टाचार विरोधात काम करतंय मात्र राज्य सरकारकडून पोलीसांवर दबाव सुरू असून मविआ सरकार आडमुठेपणा करत आहे.’ तसेच दरेकरांवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला आहे,असेही शेलार म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रविण दरेकर म्हणाले की,‘सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली असून अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचे हे षडयंत्र सुरु आहे. परंतु हाती काही लागले नाही.’
महत्वाच्या बातम्या:
- “आमचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते तरीही…”, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
- “…तरी तुम्हाला मिरची झोंबते”, फडणवीसांची शिवसेनेवर टीका
- “पंजाबच्या इतिहासात कधीच कुणी असा निर्णय घेतला नसेल”, भगवंत मान यांच्या पोस्टवरून चर्चांना उधाण
- सर्वाधिक विकेटचा रेकॉर्ड मोडल्यानंतर कपिल देवने अश्विनला पत्र पाठवले; ज्यात लिहले…
- IPL 2022: ‘घरी नंबर १ कोण?’ चाहत्याच्या प्रश्नाला धोनीचे मजेशीर उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
