🕒 1 min read
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लडेंगे और जितेंगे भी, असा दावाही त्यांनी केला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘हे अपेक्षीत होतंच…काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं आणि आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात मुंबई बँक घोटाळा प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल. लडेंगे और जितेंगे भी’, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
हे अपेक्षीत होतंच …
काल @Dev_Fadnavis जीं नी सभागृहात सांगितलं आणि आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबई बँक घोटाळा प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल….
लडेंगे और जितेंगे भी…????
We stand with @mipravindarekar ji !! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @BJP4Mumbai
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 15, 2022
दरम्यान, या प्रकरणी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रविण दरेकर म्हणाले की,‘सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली असून अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचे हे षडयंत्र सुरु आहे. परंतु हाती काही लागले नाही.’
महत्वाच्या बातम्या:
-
Breaking News : नवाब मलिकांना झटका; ईडी विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली
-
शेतकऱ्याच्या मुलाच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार!
-
“शिक्षणाच्या मंदिराला धर्माचा आखाडा बनवू नये”, हिजाब प्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
