Share

“…भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी?”, ‘मनसे’चा सवाल

Published On: 

मुंबई: संभाजीराजे छत्रपती यांचे राज्यसभेच्या सहाव्या जागी निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न दिसत आहेत. शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. कोणीही असेल तरी अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. असे असतानाच आता मनसेने सवाल केला आहे.

“राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे.”, असे ट्विट मनसे नेते केले आहे.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे दोन उमेदवार देणार आणि ते दोन्हीही निवडून आणणार असे सांगितले. “दोन जागा शिवसेना लढवणारच. आम्ही दोन्ही जागी उमेदवार देऊ आणि ते निवडून ही आणू. संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या जागेसाठी जेव्हा एखादा उमेदवार असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते.”, असे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!