पॅरिस : जगातील सगळ्यात जुना ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव सुरु आहे. या महोत्सवासाठी अनेक प्रसिद्ध कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली. यामध्ये दीपिका पादुकोणने देखील हजेरी लावली. या महोत्सवामध्ये दीपिका पादुकोणचा रोज नवीन एक ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. दीपिकाला या महोत्सवामध्ये ज्युरी सदस्य बनवण्यात आले आहे. त्यामुळे तिला प्रसिद्ध चित्रपट व्यक्तींना भेटण्याची आणि पार्टी करण्याची संधी देण्यात आली आहे.
रविवारी दीपिकाने अशाच एका पार्टीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले. ज्यामध्ये ती जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये दीपिका पांढर्या प्रिंटेड शर्ट आणि हॉट पिंक कलरच्या स्कर्टमध्ये पार्टी करताना दिसत आहे. या लुकमध्ये दीपिका तिचा पती रणबीर सोबत डायर ब्रँड पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीमध्ये प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री रेबेका हॉल देखील उपस्थित होती. दीपिकाचे रेबेका सोबत फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
https://www.instagram.com/p/Cd29ptEPaNd/
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘घरायण’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडेही दिसले होते. आणि रणवीर सिंग बद्दल सांगायचे झाले तर, तो या वर्षी मे महिन्यात रिलीज झालेल्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटात दिसला होता. पण रणवीरच्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्खूशन पच खराब होते. रणवीर स्टार असूनही हा चित्रपट ५० कोटींचा आकडाही पार करू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या :


