Share

IPL 2022 : लिटल केन विल्यमसन..! सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पुन्हा झाला बाबा; पाहा PHOTO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. पत्नी आणि मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून विल्यमसनने चाहत्यांना ही खुशखबर दिली. ही आनंदाची बातमी सांगितल्यानंतर विल्यमसनवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

आयपीएल २०२२ च्या शेवटच्या लीग सामन्यापूर्वी विल्यमसनने हैदराबादची टीम सोडली होती आणि मायदेशी परतला होता. त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता. विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघ लीगमध्ये फार काही करू शकला नाही. शेवटच्या साखळी सामन्यातही हैदराबादला पंजाब किंग्जकडून ५ विकेटने सामना गमवावा लागला. या पराभवानंतर हैदराबादने गुणतालिकेत ८व्या स्थानावर राहून यंदाच्या मोहिमेला अलविदा केला. त्याचवेळी सहाव्या स्थानावर राहून पंजाब किंग्जने लीगमधून विजयी निरोप घेतला.

विल्यमसनची बॅटही आयपीएलच्या या मोसमात कमाल दाखवू शकली नाही. त्याने १३ सामन्यात १९.६४च्या सरासरीने फक्त २१६ धावा केल्या. संपूर्ण लीगमध्ये त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले. विल्यमसन केवळ फलंदाजीतच फ्लॉप झाला नाही, तर कर्णधारपदाच्या बाबतीतही फ्लॉप ठरला. हैदराबादने सलग दोन सामने गमावून स्पर्धेची सुरुवात केली. मात्र, यानंतर संघाने जोरदार पुनरागमन करत सलग ५ सामने जिंकले. हैदराबाद प्लेऑफमध्ये जाईल असे वाटत होते, परंतु त्यानंतर संघ पुन्हा एकदा आपल्या लयीपासून दूर गेला आणि सलग ७ सामने गमावले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!