मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा लीग टप्पा रविवारी संध्याकाळी पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs PBKS) यांच्यातील सामन्याने संपला. या सामन्यात पंजाब किंग्जने हैदराबादचा २९ चेंडू आणि ५ विकेट राखून पराभव केला. हैदराबादने पंजाब किंग्जला १५८ धावांचे लक्ष्य दिले होते, जे लियाम लिव्हिंगस्टोनच्या नाबाद ४९ धावांच्या जोरावर पंजाब संघाने १५.१षटकांत पूर्ण केले. पंजाबचा आयपीएल २०२२चा प्रवास कदाचित विजयासह संपला असेल. मात्र संघाचा कर्णधार मयंक अग्रवालसाठी शेवटचा सामना चांगला ठरला नाही. फलंदाजीदरम्यान उमरान मलिकचा बाऊन्सर मयंकच्या बरगडीवर लागला. यानंतर तो जमिनीवर पडला आणि पुढच्याच षटकात तो बाद झाला. त्याने ४ चेंडूत फक्त १ धाव काढली.
या सामन्यात शाहरुख खान बाद झाल्यानंतर पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल सातव्या षटकात फलंदाजीसाठी आला. उमरान मलिकने त्याचे शॉर्ट बॉलने स्वागत केले. मयंकला चेंडूचा वेग जाणवला नाही आणि चेंडू थेट त्याच्या बरगडीला आदळला. वेदनेने ओरडत असलेल्या मयंकने एक धाव घेतली, पण त्यानंतर तो जमिनीवर झोपला.
https://twitter.com/jemi_forlife/status/1528416124668620800?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528416124668620800%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ipl-2022-umran-malik-floors-mayank-agarwal-with-a-bouncer-during-punjab-kings-vs-sunrisers-hyderabad-match-watch-4271593.html
कर्णधाराला दुखापत झाल्याचे पाहून संघाचे फिजिओ तात्काळ मैदानावर आले आणि त्याची दुखापत पाहिली. काही वेळाने मयंकला बरे वाटल्यावर तो परत खेळू लागला. पण, दुखापतीचा परिणाम म्हणा किंवा आणखी काही म्हणा, मयंक जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि पुढच्याच षटकात मोठा फटका खेळल्यामुळे झेलबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

