Share

महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व आता ”या” संयमी आणि शांत माणसाकडे

Published On: 

मुंबई: DGP म्हणजे भारत देशातील एक अत्यंत महत्वाचे पद. DGP (पोलीस महासंचालक) म्हणजेच एखाद्या राज्याचा पोलीस प्रमुख होय. भारत देशातील कोणत्याही राज्याचा पोलीस प्रमुख म्हणजे DGP होय. आजच महाराष्ट्र राज्याचे DGP बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली आहे.

राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना आपल्या पदावरुन पायउतार करण्यात आलं आहे.सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक असलेले संजय पांडे यांना पायउतार करून त्यांच्या जागी ”रजनीश शेठ” या अत्यंत शांत, संयमी आणि शिस्तबद्ध माणसाला महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख बनवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदासाठी  सध्याचे मुंबई शहराचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांचे नाव पण चर्चेत होते, मात्र त्यांनी आपणहून नकार दिल्याने ‘ रजनीश शेठ’ यांची DGP म्हणून निवड करण्यात आली आहे.

रजनीश शेठ हे १९८८ च्या आयपीएस बॅचचे पोलीस आधिकरी आहेत. मुंबईमध्ये जेव्हा २०१२ मध्ये आझाद मैदानावर दंगली झाल्या होत्या तेव्हा  रजनीश शेठ हे मुंबई शहराचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. रजनीश शेठ यांनी महाराष्ट्र राज्यात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख होते. तसेच महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. रजनीश शेठ यांचा महाराष्ट्र पोलीस दलात चांगला अनुभव आहे. एवढे अनुभवी असून सुद्धा रजनीश शेठ हे एक अत्यंत संयमी, शांत आणि शिस्तबद्ध पोलीस अधिकरी म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जातात.

महत्वाच्या बातम्या :         

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!