सिंधुदुर्ग: महाराष्ट्राला राणे परिवार आणि शिवसेना पक्ष यांच्यामधील वाद काही नवा नाही. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध अनेक आरोप- प्रत्यारोप केले गेले आहेत. अनेक वेळा टीका देखील झाल्या आहेत. त्या टीकेचे रूपांतर कधी कधी वादावादीत झाले आहे.
त्यातच आज भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईमधील जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. आम्ही कुठल्याही प्रकारच्या नोटिसीला कधीच घाबरत नाही ; मात्र आम्ही या घडवून आणलेल्या प्रकाराला कायदेशीर उत्तर जरूर देणार आहोत असे आज नितेश राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने सर्व पाहत आहे. किरीट सोमय्या असो, राणे परिवार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो जो कोणी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध बोलेल त्याला मुद्दामून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे खुल्या मैदानात आमच्याशी लढू शकत नाहीत. मैदानात हरायचं आणि शेमड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं, याला काहीच अर्थ नाही.
हे निवडणुकीच्या मैदानात आमच्याशी सामना करू शकत नाहीत आणि पुढे पण करू शकणार नाहीत म्हणून महाराष्ट्रातील सत्ताधार महाविकास आघाडी खासकरून शिवसेना शेमड्या मुलासारखं वागतीये अशी घणाघाती टीका आज भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- ‘सासू बनून त्रास द्याल तर…’; नाना पटोलेंचा मोदींना इशारा
- पुण्यातील महाविद्यालयात हिजाब समर्थनार्थ मोर्चा
- … तर माझ्यासारखा स्वीट दहशतवादी नसेल ;- अरविंद केजरीवाल यांचे कुमार विश्वास यांना प्रत्युत्तर
- ‘शिवसेनेत असल्यानंतर प्रत्येक जन वाघ होत नाही…’; नितेश राणेंचा राऊतांना टोला
- आपलाच मुलगा उमेदवार आहे, हेच विसरले मुलायम सिंह यादव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

