Share

“….पुरावे असतात तेव्हा वाझे आणि अनिल देशमुख होतो”, भातखळकरांचा संजय राऊतांना टोला

Published On: 

मुंबई: कोर्लई गावातील १९ बंगले प्रकरण सध्या चांगलेच रंगले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई गावात बंगले पाहण्यासाठी पोहचले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सोमय्यांना स्वप्नातही बंगले दिसत असल्याचा टोला लगावला आहे. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनीही टीका केली आहे.

“पुरावे नसतात तेव्हा अशी पोपट पंची करावी लागते, पुरावे असतात तेव्हा वाझे आणि अनिल देशमुख होतो.”, अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना सुनावले आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची १९ बंगले कोर्लई गावात असल्याचा आरोप करत याच्या शोधासाठीच सोमय्या तिथे पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते बाईक आणि गाड्या घेऊन आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

याठिकाणी शिवसैनिकांनीही हजेरी लावत जोरदार घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी ‘किरीट सोमय्या आगे बढो’च्या घोषणा देत समर्थन केलं. तर काही शिवसैनिकांनी सोमय्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना पांगवले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या कड्यातच सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेले. आणि अवघ्या काही मिनिटांत सोमय्या बाहेरही आले. दरम्यान सोमय्या निघून जाताच त्या जागेवर दूध आणि गोमूत्र शिंपडून शिवसैनिकांनी शुद्धीकरण केलं.

तर आज सकाळी पत्र्कारंशी संवाद साधताना संजय राऊत यांनी “कोर्लई येथील जमिनीवर एकही बांधकाम, बंगला नाही. सोमय्या यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपाच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटलं आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यासंबंधी हे लोक बोलत नाहीत. पण अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!