Share

पुण्यातील महाविद्यालयात हिजाब समर्थनार्थ मोर्चा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात काहीच दिवसांपूर्वी शाळेत धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून प्रवेश करण्यास परवानगी द्यावी याकरता आंदोलन करण्यात आले होते. कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात काही मुली ‘हिजाब’ घालून शाळेत प्रवेश करू इच्छित होत्या मात्र शाळेच्या प्राचार्यांनी धार्मिक पेहराव घालून शाळेत येण्यास सक्त मनाई केली. शाळेच्या प्राचार्यांच्या या बंधनामुळे देशात अनेक ठिकाणी प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

त्यातच आज पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेले प्रसिद्ध ”आझम कॅंपसमध्ये” हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. त्यांनी आझम कॅम्पस परिसरात बुरखा घालून हिजाब वादाचा निषेध केला. ” आझम कॅम्पस” परिसरात आज मुस्लिम मुलींनी हिजाब परिधान करून मोर्चा काढला आणि हिजाब घालणे हा आमचा धार्मिक हक्क असून तो कोणाकडूनही हिरावला जाऊ शकत नाही, असे मोर्च्यात सहभागी झालेल्या मुस्लिम मुलींकडून सांगण्यात आले.

हिजाब प्रकरण कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात घडले होते मात्र त्याचे पडसाद महाराष्ट्र राज्यात पण उमटले आहेत. आज पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये हिजाब समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याआधी मालेगाव, मुंबई आणि बीड शहरात सुद्धा हिजाब समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!