🕒 1 min read
जळगाव: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. मात्र विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका होत आहे, तर दुसरीकडे भाजप नेते या अर्थसंकल्पाचे स्वागत करत आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. महाजन म्हणाले, आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, विकास कौशल्य आदींसारखी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे, याचा फायदा थेट सर्वसामान्यांना होणार आहे, असं महाजन यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा कोरोनाच्या आपत्तीतही शेतकाऱ्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा आहे. या अर्थसंकल्पात देशाचा चौफेर विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे हा अर्थसंकल्प, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘नव्या बाटलीत जुने पेय म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प’; सुभाष देसाई यांचा टोला
-
नितेश राणे यांना जामीन मिळवण्यासाठी आधी शरण जावं लागेल – अनिल परब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
