Share

‘नव्या बाटलीत जुने पेय म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प’; सुभाष देसाई यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. मात्र या अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. यात कॉंग्रेस (Congress) तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील जोरदार टीका केली आहे.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील टीका केली आहे. महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काय मिळाले हे शोधूनही सापडणार नाही, अशी टीका पवारांनी केली आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले, यंदाचाही अर्थसंकल्प हा ‘अर्थहीन’ अर्थसंकल्प आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांची निराशा केंद्र सरकारने केली आहे. कोरोनाकाळानंतर आर्थिकचक्र वेगळ्या दिशेने फिरू लागले आहे त्यामुळे आता या आर्थिकचक्राला अधिक गती देण्याची गरज होती मात्र तसं काही झालं नाही. या बजेटमध्ये लघु उद्योजकांसाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. तसेच मुंबई ही सोन्याचं अँड देणारी कोंबडी आणि त्या कोंबडीला खाऊ घाल्याचं मात्र केंद्र सरकारला सुचत नाही, अशी टीका सुभाष देसाई यांनी केली. एका वाक्यात या बजेट बाबत सांगायचं झालं तर नव्या बाटलीत जुने पेय म्हणजे हे केंद्रीय अर्थसंकल्प, असा टोला देखील देसाई यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!