पुणे : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातून राजकीय मंडळी देखील सुटले नाहीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती.
परंतु सध्या राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. कोरोना संसर्गानंतर सातव यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील डॉक्टरांना फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी २२ एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. सध्या त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मुंबईहून लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला पुण्याला बोलवण्याबाबत हालचाली सुरु आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण होत असून रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्सिजन अभावी दौंडमध्ये ४ रुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप
- अखेर दीपाली चव्हाण प्रकरणी निलंबित वनसंरक्षक एम एस रेड्डीला अटक
- ‘दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलू नका’ पंकजांनी ठाकरे सरकारला सुनावले
- राज्यात दिवसभरात ६३ हजार ३०९ रुग्णांची वाढ, ९८५ जणांचा मृत्यू
- ‘या’ आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करुन देण्याची मागणी


