Share

ऑक्सिजन अभावी दौंडमध्ये ४ रुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप

Published On: 

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण होत असून रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

नाशिक, बीडमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असताना आता पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये ऑक्सिजन अभावी 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथील मोहन रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये मध्ये ही घटना घडली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ४ जणांचा मृत्यू झाल्याचा मृतांच्या नातेवाईकांनी आरोप केले आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी कोविड सेंटरमध्ये मोठा आक्रोश केल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी केडगाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार करून रुग्णालयावर हलगर्जीपणा आणि ऑक्सिजन अभावीच मृत्यू झाल्याचे आरोप केले आहे. तसंच या हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्याची तहसीलदारांकडे मागणी केली आहे. यावेळी अनेक अधिकार्यांनी रुग्णालयाला भेट देत नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!