बीड : केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षापुढील नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पण महाराष्ट्रात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली.
1 मे रोजी सेकंड डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे तो पाळलाच पाहिजे.. केवळ केंद्र शासनाच्या वर जबाबदारी टाकून जमणार नाही … राज्याचे #vaccine, #Remdesivir चे audit आणि daily bulletin झाले पाहिजे…#VaccineForAll
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 28, 2021
यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त लसीकरण केंद्र आणि कमीत कमी अवधी या सूत्रानेच लसीकरण मोहीम यशस्वी होईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच १८ वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण करण्याचा दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 28, 2021
१ मे रोजी सेकंड डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे. तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे व्हॅक्सीन, रेमडेसिवीरचे ऑडिट आणि दैनंदिन वार्तापत्रं झाले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. लसींचं उत्पादन करणे, साठा बनवणे, तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल, असं पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लसीकरण होताना विलंब दिरंगाई होता कामा नये.. रेमडेसिवीर सारखे वाटप अन्यायकारक होऊ नये. हे अत्यंत महत्वाचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात दिवसभरात ६३ हजार ३०९ रुग्णांची वाढ, ९८५ जणांचा मृत्यू
- ‘रिपोर्ट निगेटिव्ह दाखवा मगच मतमोजणी केंद्रावर जा’, निवडणूक आयोगाचा आदेश
- योगी ‘राज’! आजोबांना ऑक्सिजनची गरज असल्याचे ट्विट केल्याबद्दल युवकावर गुन्हा
- ‘आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत कोरोना उपचार देणे ही राज्याची जबाबदारी’, हायकोर्टाचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

