Share

‘या’ आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करुन देण्याची मागणी

Published On: 

औरंगाबाद : बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या चार-पाच दिवसांपासुन कोव्हिड लस उपलब्ध नसल्याने अनेक वयोवृद्धांना केंद्रावरुन माघारी जावे लागत आहे. तरी प्रशासनाने या केंद्रात कोव्हिड लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जि.प.च्या माजी सदस्या रंजनाताई सोळंके यांनी केली आहे.

बनोटी सर्कलमध्ये कोरोना काही अंशी आटोक्यात असून यासाठी प्रत्येक गावाचे पोलीस पाटील, सरपंच, सदस्य तसेच पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी वेळोवेळी ग्रामस्थांनी सुचना देत आहे. बनोटी सर्कल हा औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सिमेवर असून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहे.

सध्या प्रशासनाने लस देणे सुरू केले आहे. लस घेतलेल्यांमध्ये कोरोनाची बाधीत संख्या अत्यंत कमी असून यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. परंतु सोयगाव तालुक्यातील बनोटी हा डोंगराळ व दुर्गम भाग असून या परिसरात फक्त दोन टक्के लसीकरण झाले आहे. अनेकवेळा मागणी करुन देखील लस उपलब्ध होत नसून सुरवातीला लस घेण्यासाठी ग्रामस्थ नकार देत होते, परंतु वेळोवेळी केलेल्या जनजागृतीमुळे आता लस घेण्यास नागरिक तयार असून लस उपलब्ध नसल्याने आरोग्य केंद्रात नागरिक चकरा मारत आहेत. त्यामुळे तात्काळ लस उपलब्ध करून देण्याची मागणी जि.प.माजी सदस्या रंजना सोळंके यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!