अमरावती : उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे वारंवार सांगूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या आणि दीपाली चव्हाण या ‘लेडी सिंघम’च्या दुर्दैवी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या अपर मुख्य वन संरक्षक एम एस रेड्डीला अटक करण्याची मागणी अनेकांनी मागील महिन्यापासून जोर लावून धरली होती. दीपाली चव्हाण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हा अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होता. काल रेड्डी यांचे लोकेशन नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर पोलिसांची एक टीम नागपुरात दाखल आहे. यानंतर पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. या शोधमोहिमेत पोलिसांना यश आलं असून त्यांनी श्रीनिवास रेड्डीला अटक केली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने नागपुरात ही कारवाई केली आहे.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येपासून रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून केली जात आहे. भाजपाच्या वतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलन करण्यात आले. तसेच, वन विभागातील आणि शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेड्डी यांना अभय मिळते आहे असे आरोप देखील त्यांच्याकडून केले जात होते. दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास व्हावा, अशी भाजपच्या वतीने मागणी करण्यात आली होती. दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली तर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल व त्यासाठी सर्वस्वी पोलीस खाते जबाबदार राहील असा इशारा देखील भाजपच्या वतीने देण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलू नका’ पंकजांनी ठाकरे सरकारला सुनावले
- ‘रिपोर्ट निगेटिव्ह दाखवा मगच मतमोजणी केंद्रावर जा’, निवडणूक आयोगाचा आदेश
- योगी ‘राज’! आजोबांना ऑक्सिजनची गरज असल्याचे ट्विट केल्याबद्दल युवकावर गुन्हा
- ‘आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत कोरोना उपचार देणे ही राज्याची जबाबदारी’, हायकोर्टाचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

