मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील २१ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.
त्यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्यात. ‘काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात.
काँग्रेसचे युवा नेते,खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं,देशानं एक अभ्यासू,कार्यकुशल,आश्वासक नेतृत्व गमावले आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी,कार्यकर्त्यांशी जवळिकीचे,मित्रत्वाचे,सोहार्दाचे संबंध होते.ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/1KKrvxDCtE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 16, 2021
सातव यांच्या अचानक जाण्यामुळे राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून काँग्रेसमधील भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना संसर्गामुळे श्रीलंका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह! दौरा रद्द होण्याची शक्यता
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात धवनने दिलेल्या ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनी मानले आभार
- सानिया मिर्झाच्या फोटोवर साक्षी धोनीने केली भन्नाट कमेंट
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात इरफानचा पुन्हा पुढाकार ; ‘या’ माध्यमातून मिळणारी सर्व कमाई करणार दान
- ‘या’ कारणामुळे मला संघात जागा नकोय, विजय शंकरने केला खुलासा


