मुंबई : भारतीय संघाचा अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा आयपीएलमध्ये चांगली कामगीरी करुनही त्याला हवी तशी संधी भारतीय संघात मिळत नाही. त्याच्याकडे सतत दुर्लक्ष होत आहे. विजय शंकर हा त्याचा शेवटचा सामना २०१९ विश्वचषकात खेळला होता. यानंतर त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले नाही.
यादरम्यान विजय शंकरने त्याच्या संघनिवडीवर मोठे भाष्य केले आहे. विजय म्हणाला की,’मला कोणाशीही तुलना करणे पसंत नाहीये, आणि जर तुलना करायचीच असेल तर अनेक खेळाडूपेक्षा माझी कामगिरी सरस आहे असे मला वाटते. महत्वाची बाब म्हणजे जर एक अष्टपैलु खेळाडू म्हणुन जर मला संघात स्थान मिळणार असेल तर मला तसे नको आहे. माझ्या क्षमतेवर लोकांचा विश्वास असावा म्हणुन मला संघात खेळायला आवडेल.’
२०१९ विश्वचषक स्पर्धेत विजय शंकर भारतीय संघाचा भाग होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडुवर गडी बाद केला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतुन माघार घ्यावी लागली. मात्र यानंतर त्याला संधी मिळाली नाही त्यावेळी तो निराश झाला होता हेही मान्य केला. आगामी श्रीलंका दौऱ्यात त्याला संधी मिळते का आणि मिळाल्यानंतर तो कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागुन आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कसोटी क्रिकेटच्या न खेळण्याच्या वृत्ताचे भुवनेश्वर कुमारने केले खंडण
- ठरलं तर ! ‘या’ तारखेला होणार भव्य मराठा आरक्षण मोर्चा
- मालवाहतूक करणाऱ्यांसाठी आता राज्य शासनाकडून नवी नियमावली जाहीर
- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढेल – केदार
- नियमांचे उल्लंघन करत दुकाने सुरु ठेवणे पडले महागात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

