Share

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात धवनने दिलेल्या ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनी मानले आभार

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. मात्र स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटु कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढे सरसावत वेगवेगळ्या प्रकारे हातभार लावत आहे.

भारताचा आघाडीचा फलंदाज सलामीवीर शिखर धवनने गरजुंना मदत करण्यासाठी ऑक्सिजन संचाची मदत केली. धवनने केलेल्या या मदतीबद्दल गुरुग्राम पोलिसांनी ट्विट करत शिखर धवनचे आभार मानले आहे. या ट्विटला शिखर धवनने रिट्वीट करत कृतज्ञता व्यक्त केली. या ट्विटमध्ये शिखर म्हणाला की,’कोरोनाच्या या संकटाच्या काळात आपल्या लोकासाठी एक छोटीसी मदत करता आली यासाठी मी कृतज्ञ आहे.’ असे म्हणाला.

या ट्विटमध्ये पुढे शिखर म्हणाला ‘भारत या संकटवर मात करुन पुन्हा एकदा भरारी घेईल’ असे म्हणाला. यापुर्वी आयपीएल मधील पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. तर रिषभ पंत, सचिन तेंडुलकर, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, श्रीवत्स गोस्वामी, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन, अजिंक्य रहाणे या भारतीय क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!