मुंबई : यावर्षी देखील कोरोनाचं संकट कायम असल्यामुळे सर्वत्र घरी रहूनच रमजान ईद साजरी केला गेला. काेरोनाचे संकट असल्याने यावर्षीही रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करून साजरा करावा असे आदेश देखील देण्यात आले होते.
मुस्मिम बांधवांमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर ईद ऊल फितर संपूर्ण जगभरात साजरी करण्यात येते. रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर जो चंद्र दिसतो, त्याला ईद का चांद मानले जाते. शुक्रवारी १४ मे ला सर्वत्र ईद साजरी केला गेला. शहरातील मशिदींमध्ये लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. यंदा मात्र ईदवर करोनाचे सावट पसरले. या पार्श्वभूमीवर घरच्या घरी सर्वानी ईद साजरी केली गेली.

दरम्यान, भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पती शोएब मलिक यांनी देखील सर्वाना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच सानियाने ईदच्या दिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सानियाने मुलगा इजहान आणि पती शोएब मलिक तसेच कुटुंबीयांसमवेत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सानियाने यावेळी ईद दुबईत साजरी केली.
सानियाने तिचे काही फोटो शेअर केल्यानंतर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी, बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा,क्रिकेटर रॉबिन उथप्पाची पत्नी शितल गौतम, सिंगर अनन्या बिरला,अभिनेत्री समिता बंगार्गी चौधरीसह अनेकांनी या फोटो वरती कॉमेंट्स केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कसोटी क्रिकेटच्या न खेळण्याच्या वृत्ताचे भुवनेश्वर कुमारने केले खंडण
- ठरलं तर ! ‘या’ तारखेला होणार भव्य मराठा आरक्षण मोर्चा
- मालवाहतूक करणाऱ्यांसाठी आता राज्य शासनाकडून नवी नियमावली जाहीर
- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढेल – केदार
- नियमांचे उल्लंघन करत दुकाने सुरु ठेवणे पडले महागात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

