Share

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात इरफानचा पुन्हा पुढाकार ; ‘या’ माध्यमातून मिळणारी सर्व कमाई करणार दान

Published On: 

मुबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बरेच सेलेब्रिटी व क्रिकेटपटू मदतीसाठी समोर आले आहेत.

त्यातच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्वसामान्य नागरिक,तसंच फ्रंटलाइनवॉरियर्स यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना योद्ध्यांसाठीही हे पठाण बंधू मदत करत आहेत. ही मदत आणखी वाढवण्यासाठी आता इरफान पठाणने सोशल मीडियावरून आपल्याला मिळणारी सगळी कमाई दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

इरफान आणि युसुफ पठाण यांनी गरजूंना अन्नधान्याचं दान केलं असून,आतापर्यंत 90 हजारकुटुंबांना त्यांनी मदत केली आहे. त्याशिवाय पठाण क्रिकेट अॅकॅडमीने दक्षिण दिल्लीतल्या कोरोनाबाधित लोकांना मोफतजेवणही उपलब्ध करून दिलं होतं. तसेच त्यांनी आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बडोद्यात कोविड रुग्णांना जेवण उपलब्ध केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!