मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. स्पर्धा रद्द झाल्यानंतर काहीच दिवसात बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. तसेच या दरम्यान जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर पाठवण्यासाठी दुसऱ्या भारतीय संघाची बांधणी सुरु केली.
यादरम्यान भारताप्रमाणे श्रीलंकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मागील आठ दिवसात श्रीलंकेत १६३४२ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. तर १४७ रुग्णांचा कोरोनामुळे जिव गमवावा लागला. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोरोनाच्या काळातही इंग्लंड आणि इतर देशांचे दौरे यशस्वीपणे आयोजित केले होते. तेव्हा त्यांना विश्वास आहे की, भारतीय संघाचा श्रीलंका दौराही व्यवस्थितपणे पार पडु शकतो.
बीसीसीआयने काही दिवसापुर्वीच श्रीलंका दौऱ्याविषयी घोषणा केली. १३ ते २७ जुलै दरम्यान ही मालिका खेळवली जाईल असे बीसीसीआयचे आध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले होते. या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळविण्यात येणार आहे. मात्र श्रीलंकेतील कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमिवर हा दौरा स्थगित होण्याची शक्यता निर्णाण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात धवनने दिलेल्या ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनी मानले आभार
- सानिया मिर्झाच्या फोटोवर साक्षी धोनीने केली भन्नाट कमेंट
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात इरफानचा पुन्हा पुढाकार ; ‘या’ माध्यमातून मिळणारी सर्व कमाई करणार दान
- ‘या’ कारणामुळे मला संघात जागा नकोय, विजय शंकरने केला खुलासा
- कसोटी क्रिकेटच्या न खेळण्याच्या वृत्ताचे भुवनेश्वर कुमारने केले खंडण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

