लखनऊ : टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचे नाव उंचावत पदके पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. तर यावर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात जन्मलेले हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जी यांच्या नावाने खेलरत्न पुरस्काराचे नाव, हा असंख्य क्रीडाप्रेमींचा आणि संपूर्ण क्रीडा जगताचा सन्मान आहे. उत्तर प्रदेशच्या वतीने, आपले मनापासून आभार, आदरणीय पंतप्रधान जी!’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
उत्तर प्रदेश में जन्मे हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद जी के नाम पर खेल रत्न पुरस्कार का नामकरण असंख्य खेल प्रेमियों व सम्पूर्ण खेल जगत का सम्मान है।
उत्तर प्रदेश की ओर से आपका हृदय से आभार आदरणीय प्रधानमंत्री जी!
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 6, 2021
पंतप्रधानांच्या या घोषनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी हा पुरस्कार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने सुरू करण्यात आला होता. दरम्यान, काँग्रेससह विरोधकांनी आता मोदींच्या या निर्णयाला विरोध करत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, मोदींना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच; मनसेचं खुलं आव्हान !
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका


