बीड: राजेश टोपे हे राज्याचे नाही तर जालना जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असल्याचा टोला, भाजप आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी (ता. १८) आढावा बैठकीनंतर लगावला. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काहीही तयारी नाही. बालकांसाठी बेड नाहीत, बालरोग तज्ज्ञांची नेमणूक नाही. पाठपुरावा करूनही आरोग्यमंत्र्यांनी याचे साधे उत्तरही दिले नाही. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे देखी दौऱ्यावर होते. यावेळी बीडमध्ये आढावा बैठक आयोजन्यात आली होती.
कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर तसेच लसीचा तुटवडा जाणवत असल्यान त्यावरून आ. धस म्हणाले, मुंबई, पुणे, कोल्हापूरला भरपूर लशी उपलब्ध करून दिल्या जातात. जालन्यालाही पुरेशा लस भेटतात. पण, बीड जिल्ह्यालाच लस कमी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही सुरेश धस म्हणाले. सारखे केंद्राकडे बोट दाखविणारे सरकार आहे. बीड जिल्ह्याचा डेथ रेट चारपेक्षा अधिक असून राज्यात सर्वाधिक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रशासनाकडून सांगितली जाणारी २.६५ टक्के ही आकडेवारी चूक असल्याचेही ते म्हणाले. आमदार स्थानिक निधीतून रुग्णवाहिकांसाठी निधी उपलब्ध करून देऊनही खर्चास मंजुरी नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कांदा बियाणांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचेही सुरेश धस म्हणाले. पीक कर्ज वाटपही संथ गतीने आहे. पीक विम्याचा बीड पॅटर्न म्हणत असले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही भेटत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सोनिया’ सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात काम मात्र, औरंगजेबाचं करतात’
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

