मुंबई: राज्यात ४ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर दिली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत ४ कोटी ५० लाख ५ हजार ९२९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. २ ऑगस्ट रोजी एकूण ३,२३,४५२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात कालपर्यंत 4 कोटी 50 लाख 05 हजार 929 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी 3,23,452 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. pic.twitter.com/LyKctQWIfA
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 3, 2021
दरम्यान राज्याने लसिकरणात हा नवीन विक्रम केला आहे. यापूर्वी राज्यात २ कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरणाची गती राज्यात अधिक असल्याचे यातून दिसून येते. यानुसारच जिह्यातील कोरोना रेट कमी असणाऱ्या जिल्ह्यांना निर्बंध शिथिल करण्याची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबाबत जुलैरोजी त्यांनी घोषणा केली आहे. त्यात आता लसीकरण देखील वेगात सुरु असल्याने राज्यातील कोरोन रुग्णाच्या संखेत घट होताना दिसून येत आहे.
दरम्यान आता राज्यात कोरोनानंतर झिका व्हायरसचादेखील एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोननंतर आता झिका व्हायरसचे संकट राज्यावर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सलामीवीर मंयक अग्रवाल बाहेर
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या


