🕒 1 min read
दिल्ली : मागील तीन महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत होती. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असताना आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला असल्याचे देखील पाहायला मिळत होते. अशातच, भरमसाठ होत असलेल्या रुग्णवाढीमुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत होती. यामुळे भारतातील विविध ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले होते.
मात्र आता काही ठिकाणी करोनाच्या नवीन रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या नवीन केसेस कमी झाल्या आहेत. हे पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज हळूहळू दिल्ली अनलॉक करण्याची घोषणा केलीय. जनतेच्या मागणीनुसार आणि तज्ज्ञांच्या मतांच्या आधारे आम्ही हळूहळू लॉकडाऊन उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू, असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
केजरीवाल म्हणाले, दिल्लीत कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. गेल्या 24 तासात संसर्ग दर 1.5% झाला आहे आणि कोरोनाची सुमारे 1100 रुग्णांची नोंद झाली आहे. ‘कोरोनाविरूद्ध लढाईत दिल्लीकरांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे दिल्लीतील परिस्थिती वेगाने सुधारत आहे, लॉकडाऊननंतर दिल्ली हळूहळू अनलॉक करण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळपासून बांधकाम क्षेत्र व कारखाने सुरू केले जाणार आहेत. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर स्मार्ट सिटी बसला मिळाला मोबदला, १ कोटी ७० लाख आले, ८ लाख बाकी!
- राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही ?, जयंत पाटलांनी दिले ‘हे’ उत्तर
- धक्कादायक! सुनेच्या जाचास कंटाळून सासऱ्याची आत्महत्या!
- ‘शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्या दोषींवर कठोर कारवाई करा’
- हात जोडून सांगतो माझं-तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ; संभाजी राजेंचं फडणवीसांना साकड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
