Share

‘लसीबाबत मी ‘तसं’ बोललोच नाही’; राजेश टोपेंचे स्पष्टीकरण

Published On: 

जालना: राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याच सोबत ओमायक्रॉन विषाणूचा देखील मोठ्या प्रमाणात संसर्ग होताना दिसत आहे. ही परिस्थिती पाहता लसीकरण करण्याचा वेग वाढणीच्या मागे राज्य तसेच केंद्र सरकार लागले आहे. याच संदर्भात आरोग्य मंत्र राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलताना म्हणाले, आजचा दिवस महत्वाचा आहे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Corona Vaccine)1 वर्ष पूर्ण झाले आहे.राज्यात आपण ९० टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. दोन डोस ६२ टक्के लोकांना लस दिले आहे. आणखी आपल्याला काम करायचं आहे, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.

त्याच सोबत केंद्र सरकार लसी देत नाही असं वक्तव्यं टोपे यांनी केले होत अशी चर्चा सुरू होती, यावर प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ६० लाख मुलांचे लसीकरण करायचं आहे त्यासाठी कोवॅक्सिन आवश्यक असून बुस्टर डोस लसीकरणही सुरु झालेलं आहे ते देणं गरजेचं आहे. आम्ही महिन्याचे हिशोब करुन ५० लाख कोविशिल्ड मागणी केली होती. केंद्र आम्हाला लस उपल्ब करुन देत नाही असे कधीच आम्ही बोललो नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!