Share

जयंत पाटलांनी थेट एलॉन मस्क यांनाच दिले आमंत्रण

Published On: 

मुंबई: इलेक्ट्रिक कार निर्मितीत आघाडीवर असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीचा प्रकल्प भारतात सुरू करण्यासाठी एलॉन मस्क (Elon Musk) यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे एलॉन मस्क यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधून एलॉन मस्क यांना प्रकल्प सुरू करण्यासाठी आमंत्रण दिले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील एलॉन मस्क यांना आमंत्रित केले आहे. एलॉन मस्क यांनी भारतात कंपनीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी आव्हांनाचा सामना करावा लागत असल्याचे ट्विट केले आहे. त्या ट्विटला पाटील यांनी रविवारी सकाळी उत्तर देत महाराष्ट्रात उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे.

जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, ‘एलॉन मस्क, महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक सर्वात प्रगतीशील राज्य आहे. भारतात कंपनीला सुरू करण्यासाठी महाराष्ट्राकडून सर्व सहकार्य केले जाईल. महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे. इतर राज्यांकडूनही मस्क यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!