नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी मतदानाची तारीख घोषित केलेली आहे. मात्र आता या निर्णयाला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी विरोध केला आहे. चरणजीत सिंह चन्नी (Punjab Chief Minister Charanjit Singh Channy)यांनी निवडणूक आयोगाला ही निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलण्याची मागणी पत्र लिहित केली आहे.
निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी गुरु रविदास जयंतीचा हवाला देत १४ फेब्रुवारी रोजी पंजाब विधानसभा निवडणुकीचे मतदान किमान सहा दिवस पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. ‘१६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री गुरु रविदास यांची जयंती आहे, या दिवशी मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेशातील वाराणसीला जातात. अशा स्थितीत १४ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने लोक मतदानापासून वंचित राहू शकतात.’ असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे त्यांनी दलित समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन निवडणुकीची तारीख अशा प्रकारे ठेवण्याची विनंती केली की, संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमातही त्यांना सहभागी होता येईल आणि मतदानाचा हक्क देखील बजावता येईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलण्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केले आहे. सदरील पत्र त्यांनी १३ जानेवारीरोजी लिहिले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा”, नवाब मलिकांचा रवी किशन यांना टोला
- जयंत पाटलांनी थेट एलॉन मस्क यांनाच दिले आमंत्रण
- ‘तृणमूल कॉंग्रेस तर सत्तेवर आली आहे, आता फक्त…’; संजय राऊतांचा टोला
- ‘गोवाचं ‘कॅरेक्टर’ सुधरवायचं असेल तर…’; संजय राऊतांचे वक्तव्यं
- मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, ‘हे केंद्राचं नाही तर महाराष्ट्राचं सरकार आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

