Share

जायचे होते परभणीला; परंतु झाले असे काही मायलेकींनी घेतली धावत्या रेल्वेतून उडी!

Published On: 

औरंगाबाद: जायचे होते परभणीला परंतु बसल्या मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमध्ये. चुकीच्या रेल्वेत बसल्याचे लक्षात येताच आई आणि मुलीने चक्क धावत्या रेल्वेतून उडी मारली. आई बाजूला पडली. परंतु मुलगी रेल्वेखाली जाणार तोच रेल्वे प्रवाशी सेनेच्या अध्यक्षांनी मुलीचा जीव वाचविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मन हेलावून टाकणारी ही धक्कादायक घटना औरंगाबाद येथील रेल्वेस्थानकावर घडली सुदैवाने यात कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही.

धावत्या रेल्वेत चढू नका, धावत्या रेल्वेतून उतरू नका असे वारंवार सांगूनही काही प्रवाशी याकडे दुर्लक्ष करून स्वतः चाच जीव धोक्यात घालत असल्याचे एका घटनेतून शुक्रवारी (दि.१४) दुपारी दोनच्या सुमारास दिसून आला आहे. घटनेची माहिती अशी की, औरंगाबादवरून परभणीकडे जायचे असल्याने रेल्वे स्थानकावर उभी असलेली रेल्वे कुठे जाणार याची चौकशी न करता मुबंईला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमध्ये आई आणि मुलगी बसल्या. वीस मिनीटापासून रेल्वे उभी होती. तसेच रेल्वे कुठे जाणार आहे? याची अनाऊन्सिंग देखील केली जात होती.

तपोवन एक्सप्रेसमध्ये बसूनही आपण चुकीच्या रेल्वेत बसलो असल्याचे आई आणि मुलीच्या लक्षात आले नाही. आणि ऐन रेल्वे सुटली आणि मुंबईकडे रेल्वे निघताच चुकीच्या रेल्वेत बसलेल्या आई-मुलीच्या लक्षात आले आणि त्यांनी कुठलाही विचार न करता रेल्वे सुरू असतानाच रेल्वेतून उडी मारली आणि जीव धोक्यात घातला. आई बाजूला फेकली गेली आणि मुलगी रेल्वे खाली जाणार तोच शेजारच्या डब्ब्यात दारात उभे असलेल्या रेल्वे प्रवाशी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी देखील उडी मारून स्वतःचा जीव धोक्यात घालुन मुलीचा जीव वाचविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जीव धोक्यात घालू नका

एकतर रेल्वे कुठे जाणार आहे याची चौकशी करूनच रेल्वेत बसावे. याशिवाय अनाऊन्सिगकडे लक्ष ठेवावे. हेडफोन लावून गाणे ऐकणे अनाऊन्सिंगकडे लक्ष न देणे यामुळे देखील बऱ्याचदा जायचे असते एकीकडे आणि दुसऱ्याच रेल्वेत बसतात. परंतु चुकीच्या रेल्वेत जरी बसले तरी मध्ये ज्या स्टेशनला रेल्वे थांबेल त्या ठिकाणी उतरून घेता येऊ शकते. परंतु धावत्या रेल्वेतून चुकीच्या रेल्वेत बसलो म्हणून उडी मारून आपला जीव धोक्यात घालू नका. असे आवाहन रेल्वे प्रवाशी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!